सौ. प्रितम सुभाष दिवटे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार जाहीर

सौ. प्रितम सुभाष दिवटे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार जाहीर

Size
Price:

Read more

सौ. प्रितम सुभाष दिवटे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार जाहीर
 वनाझ परिवार विद्या मंदिर शाळेच्या शिक्षिका, ता. पुणे शहर , जिल्हा पुणे येथील आदर्श शिक्षिका सौ. प्रितम सुभाष दिवटे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल (एम. एस.पी ) चा राज्यस्तरीय सेवा सन्मान (आदर्श शिक्षक) पुरस्कार जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आला आहे , जिल्हा निवड समिती द्वारे त्यांची पुणे जिल्ह्यातुन निवड करण्यात आली आहे.
                   महाराष्ट्र शिक्षक पॅनल टीमच्या वतीने अध्यक्ष दीपक चामे, उपाध्यक्षा मेघाराणी जोशी, सचिव सतीश कोळी, जिल्हा निवड समिती सदस्य मोहन शिंदे , मनोज पांचाळ , किरण वाळके , सागर कांबळे  यांच्याद्वारे उपक्रमशील शिक्षिका सौ. प्रितम सुभाष दिवटे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान (आदर्श शिक्षक ) पुरस्कार निवड पत्र देण्यात आले . शिक्षणाबरोबरच विद्यार्थी सर्वांगीण विकासास पूरक कौशल्यपूर्ण उपक्रम , सर्जनशील प्रकल्प , लेखन आणि वाचन यात पाय मजबूत करणारे प्रकल्प हाती घेऊन चालू पिढीला भविष्यवेधी शिक्षण दिले जाते , तसेच उत्कृष्ट  निवेदक , सूत्रसंचालक , शिघ्रकवी , कार्यानुभव कलाकुसर शिक्षक अशी ओळख निर्माण करणाऱ्या  अशा अनेक उपक्रमातून त्यांच्या कार्याचा फायदा शिक्षण क्षेत्राला आणि भारताचे आधारस्तंभ असणाऱ्या भावी पिढीला होत आहे , त्यामुळे त्यांच्या कार्याची प्रेरणा विद्यार्थी वर्ग  , शिक्षक वृंद , शाळा, सर्वांनाच होत आहे, सादर पुरस्कार वितरण सोहळा गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक येथे १४ मे २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत  करण्यात येणार आहे. या निवडीबद्दल मुख्याधापक , शाळा व्यवस्थापन समिती , सर्व सहकारी शिक्षक, पालक, विद्यार्थी अशा सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.