श्री. प्रसाद गोपाळ देशपांडे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार जाहीर

श्री. प्रसाद गोपाळ देशपांडे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार जाहीर

Size
Price:

Read more

श्री. प्रसाद गोपाळ देशपांडे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार जाहीर
             जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नऱ्हे , ता. हवेली , जिल्हा पुणे येथील आदर्श शिक्षक श्री. प्रसाद गोपाळ देशपांडे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल (एम. एस.पी ) चा राज्यस्तरीय सेवा सन्मान (आदर्श शिक्षक) पुरस्कार जिल्हा निवड समिती द्वारे त्यांची पुणे जिल्ह्यातुन निवड करण्यात आली आहे. 
        महाराष्ट्र शिक्षक पॅनल टीमच्या वतीने अध्यक्ष दीपक चामे, उपाध्यक्षा मेघाराणी जोशी, सचिव सतीश कोळी, जिल्हा निवड समिती सदस्य मनोज पांचाळ , मोहन शिंदे , किरण वाळके , सागर कांबळे  यांच्याद्वारे उपक्रमशील शिक्षक श्री. प्रसाद गोपाळ देशपांडे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान (आदर्श शिक्षक ) पुरस्कार निवड पत्र देण्यात आले . विद्यार्थ्याचे उज्ज्वल भविष्य आपल्या विविध शैक्षणिक अनुभवातून घडवून त्याला एकविसाव्या शतकातील आव्हाने पेलण्यास तयार करणे व सुजाण नागरिक करण्यास सर्वोत्तम शिक्षण पद्धतीचा स्वीकार करणारे अशी ओळख आहे , त्यामुळे त्यांच्या कार्याची प्रेरणा विद्यार्थी वर्ग  , शिक्षक वृंद , शाळा, सर्वांनाच होत आहे, सादर पुरस्कार वितरण सोहळा गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक येथे १४ मे २०२४ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत  करण्यात येणार आहे. या निवडीबद्दल मुख्याधापक , शाळा व्यवस्थापन समिती , सर्व सहकारी शिक्षक, पालक, विद्यार्थी अशा सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.