कोरोना काळातील कमलापूर शाळेचे ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण

कोरोना काळातील कमलापूर शाळेचे ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण

Size
Price:

Read more

                
शैक्षणिक वर्ष 2019-2020 शेवटच्या टप्प्यात आले असताना अचानक covid-19 मुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व व्यवस्थाप नाच्या शाळा दिनांक 14 मार्च 2020 पासून अचानक बंद कराव्या लागल्या ,जि.प.प्रा. शाळा कमलापूर शाळेत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग असून विद्यार्थी संख्या 200 आहे, कमलापूर हे परभणी जिल्ह्यातील पूर्णा आणि परभणी या दोन तालुका सीमेवरती वसलेले गाव,गावातील आर्थिक परिस्थिती तशी बिकटच गावातील सुमारे सुमारे पन्नास टक्के लोक मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात .कामानिमित्त मुंबई ,पुणे ,औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेले लोक टाळे बंदी च्या काळात गावी परतत होते,दिनांक 25 मे 2020 रोजी गावात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला, संपूर्ण गाव सीलबंद करण्यात आले, त्यावेळी जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णाची संख्या 6 ते 7 होती,त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, तहसील प्रशासनामार्फत सर्व शिक्षक आणि आशा,अंगणवाडी सेविका आरोग्यसेवक यांच्यामार्फत र्सर्वेक्षण काम सुरू झाले, अडीच तीन महिन्यांच्या कालावधीनंतर आज शाळेतील विद्याथ्री,पालक यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली,तत्पूर्वी फोनद्वारे पालकांशी संपर्क सुरू होताच गेल्या वर्षी ,शैक्षणिक वर्षी सुरू केलेला 'माझ्या गावची शाळा 'हा whats app ग्रुप ताळेबंदीच्या काळात खूप कामाला आला होता, कारण त्या ग्रुपद्वारे आम्ही शाळेतील सर्व आठ शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य,तसेच सर्व पालकांच्या संपर्कात होतो, विविध शैक्षणिक pdf, व्हिडिओ, ऑनलाईन टेस्ट त्यावर सर्वजण शेअर करत होतो.सलगचौदा दिवस आम्ही कोरोनाचा सर्वेक्षण करत असतानाच प्रत्येक कुटुंबनिहाय अँड्रॉइड फोन,दूरदर्शन,तसेच पर्यायी व्यवस्था ही देखील माहिती संकलित केली,त्यामुळे आमच्यापुढे प्रत्यक्ष आकडेवारी जमा झाली,ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे अशा पालकांना आम्ही वैयक्तिक वैयक्तिक संपर्क साधून दीक्षा अँप,तसेच गूगल मीट हे अँप डाऊनलोड करून दिले ,आणि त्यांचा वापर कसा करावा याची थोडक्यात माहिती दिली. कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा रिपोर्ट निगेटिव आल्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.मग आम्ही सर्व शिक्षकांनी ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही परंतु ज्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे अशा पालकांना अँड्रॉइड मोबाइल घेण्याची विनंती केली, आमच्या विनंतीला मान देऊन आणि आपल्या पाल्याचे हित लक्षात घेऊन दहा पालकांनी नवीन अँड्रॉइड मोबाईलची खरेदी केली. दिनांक 15 जून 2020 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली परंतु विद्यार्थ्या विना .शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय पाठ्यपुस्तके घरपोच वाटप करण्यात आली. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले, पुस्तके पण मिळाली पण शाळा केव्हा सुरू होणार ?हा प्रश्न पालकामार्फत आम्हाला सतत विचारला जात होता परंतु रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शाळा केव्हा सुरू होतील हे कोणालाही सांगणे शक्य नव्हते, मग आम्ही सुरुवात केली गुगल मीटद्वारे अध्यापनाला, गुगल मीट अध्यापनाचा  वेळ संध्याकाळी ठेवण्यात आला याचे कारण काय तर पालक दिवसभर घरी नसतात ,पालक आपल्या कामानिमित्त दिवसभर शेतात मजुरी करण्यास गेलेले असतात .पहिले चार दिवस आम्हाला गुगल मीट चा वापर कसा करावा हे प्रशिक्षण देण्यासाठी गेले,या चार दिवसात  विद्यार्थी आणि पालक गुगल मीटचा प्रभावीपणे वापर करू लागले. मग आम्ही सर्व शिक्षकांनी वर्गनिहाय,विषयनिहाय, वेळेचे नियोजन करून वेळापत्रक तयार केले ,संध्याकाळी सात ते नऊ हा वेळ निश्चित करण्यात आला.मीटिंगमध्ये दिवसनिहाय विद्यार्थी सहभाग वाढला.दररोज विद्यार्थी संध्याकाळी पावणेसात वाजल्यापासून ऑनलाईन क्लास साठी तयार राहू लागले.एखाद्या दिवशी मीटिंग ची लिंक ग्रुपवर देण्यास उशीर झाला की एकामागून एक फोन तयारच सर आज लिंक नाही पाठविली. लिंक पाठविणे आणि मीटिंगचे आयोजन श्री आबुज सर अगदी चोखपणे पार पाडत आहेत.
ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे असे सर्व विद्यार्थी ऑनलाईन क्लास जॉईन होऊ लागले, परंतु ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, त्यांचे काय हा प्रश्न निर्माण झाला .या मुद्यावर आम्ही सर्व शिक्षकांनी मिळून एक तोडगा काढला ज्याच्याजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे, अशा विद्यार्थ्या जवळ त्याच्या शेजारील विद्यार्थी, भावकी मधील,ज्याचे घरगुती संबध एकोप्याचे आहेत अशा विद्यार्थ्यांना पालकांची संमती घेऊन सामाजिक अंतर राखून ऑनलाईन क्लास ला बसण्याचे सुचविले,याचा चांगला परिणाम म्हणजे एका मोबाईलवर पाच पाच विद्यार्थी एका वेळी अध्ययन करू लागली.आम्हाला या क्लास चे काही फायदे दिसून आले.
Google meet ऑनलाईन क्लास चे फायदे
1)घर बनले शाळा-ऑनलाईन क्लास मुळे प्रत्येक घर शाळा बनल्या,कारण विद्यार्थी शाळेत बसून जे शिक्षण घेत होती ते शिक्षण घरी मोबाईलवर घेऊ लागली.विद्यार्थी आम्हाला शाळाच सुरू आहेत असे वाटत आहे अशा बोलक्या प्रतिक्रिया देऊ लागली.विद्यार्थ्यांचे घरे शाळा बनल्या, तसेच शिक्षकांची घरे ही शाळा बनल्या कारण सर्व शिक्षकांनी घरातच फलक बसविले, पाठ्यपुस्तके संदर्भ पुस्तके यांचा संग्रह केला.
.2)पालक बनले विद्यार्थी-एरवी आपला विद्यार्थी कोणत्या वर्गात शिकतो याची कल्पना नसणारे माता पालक तसेच पिता पालक ऑनलाईन क्लास पाहून प्रभावित झाले आणि विद्यार्थ्यांसोबत मराठी,इंग्रजी वाचन,लेखन तसेचमूलभूत क्रिया शिकू लागली आहेत.
3)इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद शाळेकडे घरवापसी
जिल्हा परिषद शाळेतील covid 19 काळातील विविध उपक्रम पाहून इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणारे पाच विद्यार्थी आमच्या  
जि .प ,शाळेत दाखल झाले. ऑनलाईन क्लास ला दररोज उपस्थित राहू लागले.
4)विनासुट्टीचा ऑनलाईन क्लास-,आम्ही गूगल मीट ऑनलाईन क्लास गेले तीन महिन्यापासून विनासुट्टी अगदी रविवार तसेच सण ,उत्सव असला तरीही सलगपणे चालवीत आहोत.यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात सातत्य टिकून आहे.
5)भौगोलिक सीमा ओलांडून क्लास चालू-ऑनलाईन शिक्षणाला भौगोलिक सीमाची मर्यादा नसते,ऑनलाईन क्लास ने प्रभावित होऊन अगदी गावातील विद्यार्थ्यांचे नातेवाईकांना क्लास ची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गुगल मीट अँप डाउनलोड करून घेऊन माहिती करून घेतली,अगदी उस्मानाबाद, हिंगोली,नांदेड आदी जिल्ह्यातील काही विद्यार्थी ऑनलाईन कलासचा लाभ घेत आहेत.
6)मान्यवरांच्या भेटी-आम्ही या क्लाससाठीआठवड्यातुन एकदा एका शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक,अधिकारी, यांचे विद्यार्थी, पालक यांना अर्धा तास मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो,आतापर्यंत पूर्णा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री,साबळे साहेब,केंद्रप्रमुख श्री दयानंद स्वामी,गटसाधन केंद्रातील श्री व्ही.टी. जाधव तसेच केंद्रातील उपक्रम शील शिक्षक यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले आहे.
ऑनलाईन शिक्षण हे 100%विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी अनेक अडचणी आल्या. ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही ,अशा विद्यार्थ्यांकरिता 
1)स्वयंअध्ययन गटाची निर्मिती- एका गल्लीतील,एका समाजातील 8 ते 10 विद्यार्थ्यांचे सोयीने गट पाडले, आणि गावातील सुशिक्षित तरुणांची स्वयंसेवक म्हणून निवड केली.त्यामुळे विद्यार्थी ठराविक वेळेत मोकळ्या जागेत,मंदिर,चावडी अशा ठिकाणी सामाजिक अंतर राखून गटात बसून एकमेकांच्या तसेच स्वयंसेवक ,शिक्षक यांच्या मदतीने अध्ययन करीत आहेत.
2)टिली मिली द्वारे अध्ययन- ज्ञानरचनावादावर आधारित टिली मिली या आनंददायी मालिका पाहून शिकण्यासाठी दूरदर्शन असणारा आणि नसणारा अशा तीन ते चार विद्यार्थ्यांची जोडी लावून दिली,त्यामुळे ते या मालिकेच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण कारत आहेत.
3)स्वाध्याय पुस्तिकेचे वाटप-ऑनलाईन क्लास, टिली मिली मालिकेमुळे मुले शिकत आहेत,परंतु आकलन किती झाले हे पाहण्यासाठी वर्गवार अध्ययन निष्पत्तीवर आधारित स्वाध्याय पुस्तिका सोडवून घेण्यात येत आहेत,. 
4)You tube व्हिडिओ निर्मिती-माझे Santosh A Ratnaparkhe नावाचे youtube चॅनेल असून त्याद्वारे शाळेचे विविध उपक्रम,अभ्यासक्रम व्हिडिओ प्रसारित करून अध्यापनाचे कार्य चालू आहे.
5)माझा ऑनलाईन अभ्यास चळवळ-आपण केलेल्या व्हिडिओ निर्मितीचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांपुरता सीमित न राहता त्यांचा उपयोग संपूर्ण महाराष्ट्रात सर्व विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे या उदात्त हेतूने प्रेरित होऊन आमचे मित्र तंत्रस्नेही शिक्षक श्री मोहन शिंदे हवेली पुणे यांच्या संल्पनेतून श्री मनोज पांचाळ बहुलीश्री सागर कांबळे,श्री मोहन शिंदे,आणि मी संतोष रत्नपारखे या आमुच्या शिक्षक टीम मार्फत 10 सप्टेंबर 2020 पासून माझा ऑनलाईन अभ्यास इयत्ता पहिली ते चौथी सर्व विषय आणि सर्वांगीण विकास अंतर्गत कला,कार्यनुभव,संगणक शिक्षण,शारीरिक शिक्षण, मी इंग्रजी बोलणारच आदी बाबत व्हिडिओ आणि ऑनलाईन टेस्ट दररोज प्रकाशित होतात. या उपक्रमाला संपूर्ण राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
6)covid 19 काळात उल्लेखनीय शैक्षणिक कार्य केल्याबद्दल जिल्हा परिषद परभणी शिक्षण विभागामार्फत मला ऑनलाईन प्रमाणपत्र देऊन मा, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री,बी. पी. पृथ्वीराज साहेब तसेच मा, शिक्षणाधिकारी श्रीमती पाटेकर  मॅडम यांच्या स्वाक्षरी प्रमाण पत्राद्वारे  गौरविण्यात आले. या दोन अधिकाऱ्यांचा प्रेरणेने परभणी जिल्हयात कोरोना काळात शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
हे सर्व उपक्रम राबविताना अनेक अडचणी आल्या,परंतु सुयोग्य नियोजन आणि आमच्या शाळेतील मुख्याध्यापक श्री पलये बी. आर,श्री महेश जाधव,श्री कलीम शेख,,श्री रवी जाधव,श्री, सचिन राठोड, श्री नितीन चौकेवार आणि श्री दत्ता आबुज या मेहनती शिक्षकांमुळे  आणि केंद्रप्रमुख श्री दयानंद स्वामी  यांच्यामुळे जि प प्रा शा कमलापूर केंद्र फुलकळस ता.पूर्णा, जि.परभणी या शाळेत covid19 काळात शिक्षणाची पर्यायी व्यवस्था म्हणून ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाचा सुरेख मेळ साधला आहे.
शेवट या ओळीने करावा वाटतो,या ओळी कोणाच्या आहेत हे माहीत नाही परंतु त्या शिक्षकांसाठी खूपच प्रेरणादायी आहेत.
सुंदर सुर सजाने को साज बनाता हूँ | नौसिखीये परिंदों को ,बाज बनाता हूँ |
चुपचाप सुनता हूँ ,शिकायते  सबकी |तब दुनिया बदलने की आवाज बनाता हूँ |
समंदर तो परखता है ,हौसले कास्थियों के|मै डूबती कस्थियों को ,जहाज बनाता हूँ|
बनाये चाहे चाँद पे कोई  बुर्ज ए खलिफा| अरे मै तो कच्ची इटोसे ही ताज बनाता हू|
                                                                                                                    शब्दांकन 
                                                                                                   श्री संतोष रत्नपारखे, प्राथमिक शिक्षक
                                                          जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कमलापूर केंद्र फुलकळस,ता. पूर्णा, जि. परभणी
                                                                           केंद्र फुलकळस,ता. पूर्णा, जि. परभणी  भ्रमणध्वनी 9767871960
            My  U TUBE CHANNEL   https://www.youtube.com/channel/UCkXOjxPbzu_rLP9Itqdx4ng



                                                                                                      
.