Read more
विना संपर्क शिक्षणासाठी व्हिडिओ एक शस्त्र.
विना संपर्क शिक्षणामध्ये व्हिडिओ एक महत्त्वपूर्ण शस्त्र आहे जे आपले काम अत्यंत सोप्या पद्धतीने ऑडियो व्हिडिओ स्वरूपात पाहण्यासाठी उपलब्ध करून देता येते. सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले महत्त्व कमी होऊ नये या करिता प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहे , नव्हे त्यांची स्पर्धाच लागली आहे असे म्हणले तरी चालेल. विना संपर्क शिक्षणासाठी तयार केलेले व्हिडिओ जितके प्रभावी असतील तितके अधिक ज्ञान दृढीकरण होते. त्यामुळे शिक्षणासंबंधी आवड असलेला विद्यार्थी - पालक - शिक्षक आपोआपच याकडे वळतो आहे. त्यामुळे या तिन्ही व्यक्तींना त्यांचे हेतू साध्य होण्यास मदत होत आहे.
कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव शाळा बंद करण्याची वेळ आली तेव्हा मला विद्यार्थ्यांचे शिक्षण लॉक डाऊन काळात कसे चालू राहील याचा विचार करावा लागला . ग्रामीण भाग असल्याने अनेक समस्या येणार होत्या हे निश्चित असे गृहीत धरून सुरूवातीला काय करता येईल याचा विचार केला. मी प्रथम प्रत्येक कुटूंबाचा प्राथमिक सर्वे करून घेतला. यात प्रत्येक घरात टीव्ही, ऍन्ड्रॉइड, मोबाईल , रेडिओ , संगणक , इंटरनेट सुविधा आणि इतर यापैकी कोण कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती फोन द्वारे व आधीचे असलेले व्हाट्सअप ग्रुप याच्या मदतीने गोळा केली. त्यामुळे माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण कसे पोहचवता येईल याचा विचार करता आला. वरील साधनांद्वारे मी सुरूवातीला पुस्तकातील घटकावर लहान लहान विडिओ रेकॉर्ड करून पाठवले . यात व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहचताना अनेक अडचणी आल्या . जश्या अनेक अडचणी आल्या तसे तसे त्याची उत्तरे शोधली. ज्याकडे स्मार्ट टिव्ही आहे त्यास पेन ड्राईव्ह मध्ये व्हिडिओ संकलित करून दिले स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पालकांना इंटनेट द्वारा कसे विडिओ पाहता येतील याची माहिती झूम मिंटीग द्वारे दिली. रेडिओ , डिश टिव्ही वरील शैक्षणिक कार्यक्रम मुलांना कोणते दाखवावेत याची माहिती दिली. मोबाईल चा वापर किती वेळ अभ्यासात करता येईल याचा विचार करून लहान लहान व्हिडिओ लिंक्स पाठविल्या. ज्या भागात इंटरनेट रेंज नाही तेथील जे पालक दुध विक्री करणारे आणि अत्यावश्यक सेवेत शहराकडे येतात अशा पालकांना शहराकडे येता वेळी मोबाईल मध्ये भरून दिले. असे अनेक विविध अनुभवातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे सातत्य टिकविण्याचा प्रयत्न केला यात सगळ्यात जास्त मला प्रभावीपणे व्हिडिओ या इ साहित्याचाच खुप उपयोग झाला.
विद्यार्थीवर्ग स्वतः अशा व्हिडिओ या साधनाचा शोध घेतो जेथे त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. जर त्याला एखादा व्हिडिओ त्याच्या प्रश्नावर समाधान करणारा वाटत नसेल तर त्याला अनेक समाधानकारक व्हिडिओ पाहण्याची सोय यूट्यूब आणि यूट्यूब किड्स मध्ये आहे, या शिवाय आणखी बरीचशी ऑनलाईन संसाधने आहेत जेथे त्याला वर्गीकरण केलेले आणि वेगवेगळ्या भाषेतून व्हिडिओ उपलब्ध असतात.
पालक आपल्या पाल्याला ज्या प्रकारे आवड आहे त्या प्रकारे व्हिडिओ उपलब्ध करून देऊन त्याचे शिक्षण घडवून देऊ शकतात. यासाठी पालक अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ ची रचना करू शकतात तसेच अभ्यासक्रम शिवायही इतर घटकावर देखील त्याला माहिती प्राप्त करून देता येऊ शकते ज्यामुळे पाल्याचा कल कोणत्या दिशेला आहे हे समजायला अधिक मदत होऊ शकते .उदा. क्राफ्ट पेपर वर्क, फिजिकल ऍक्टिव्हिटीज , गेम्स, सिंगिंग, डान्सिंग अशा शिक्षणासाठी देखील व्हिडिओ उपलब्ध असतात.
शिक्षकांना देखील आता या आपल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंड चालत राहावे , आपल्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये याकरिता व्हिडिओ हे एक साधन अत्यंत प्रभावीपणे वापरता येईल. व्हिडिओमध्ये प्रशिक्षक स्वतः शिकवीत आहेत असे विद्यार्थ्यांना व्हिडिओ मार्फत वाटले तर जो भाग शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्याला समजून घ्यायचा आहे तो अत्यंत प्रभावीपणे समजून येईल . यावर अनेक प्रकारे प्रेझेन्टेशन सादरीकरण करता येते आणि शिक्षण प्रक्रिया चालू राहते. त्यामुळे विना संपर्क येता सर्वांचे शिक्षण होण्यास अत्यंत मदत होत आहे . त्यमुळे हे एक शस्त्र आहे असे म्हणणे वावगे वेगळे ठरणार नाही.
व्हिडिओ चे फायदे तोटे दोन्ही आहेत जसे – एखादा घटक विद्यार्थ्याला नाही कळाला तर तो पुन्हा पुन्हा मागे घेऊन त्यातील कल्पना समजावून घेऊ शकतो. तो व्हिडिओ जर आपल्या मोबाइल किंवा कॉम्प्युटर / टिव्ही वर जतन करून ठेवल्याने शिक्षण घेणाऱ्याला ते त्याच्या वेळे नुसार कधीही पाहता येतात आणि कितीही वेळा पाहता येतात. व्हिडिओ हे लहान लहान मेमरी स्टोरेज मध्ये जतन करून ठेवले जात आसल्याने जागेचाही प्रश्न उद्भवत नाही – जिथे शैक्षणिक साहित्य ठेवण्यास जागा वापरावी लागते. याच बरोबर काही अमुर्त कल्पना ह्या आभासी 3D मॉडेल ऍनिमेशनचा वापर करून दाखविल्या तर त्या समजण्यास अधिक मदत होते. फुलपाखराची वाढ किंवा वनस्पतींची वाढ कशी होते हे समजण्यास जंगलात जाऊन बसण्याची गरज नाही. म्हणूव व्हिडिओ एक शस्त्र आहे.
आता आपण याचे तोटे पाहूयात व्हिडओ सादर करताना जर तो उद्देश साध्य करणारा असेल तरच तो प्रभावी ठरतो नाही तर त्यात आपला बराचसा वेळ वायाला जाऊ शकतो. अनेक वेळा जर व्हिडिओ मधील काही बाबी सादरीकरण करताना ऍनिमेशन योग्य नाही निवडले गेले तर अनेक वेळा वेगळा अर्थ तेथे निघू शकेल आणि व्हिडिओ अयशस्वी होईल. व्हिडिओ जास्त वेळाचा असेल तर तो विद्यार्थ्यांना कंटाळवाणा वाटू लागेल किंवा मनोरंजक असेल तर जास्त वेळ स्क्रिन टाईम झाल्याने डोळ्याना त्रासदायक ठरू शकतील. असे काही तोटे देखील आहे.
त्यामुळे माझ्या दृष्टीने व्हिडिचा वापर जर योग्य पद्धतीने योग्य उद्देश साध्य करण्यासाठी केला तर ते नक्कीच आपल्याला शैक्षणिक साहित्य शस्त्र वाटेल.
श्री. मोहन सुनिल शिंदे.
एम.ए , बी.एड्. ( 7722005487)
जि. प. प्रा. शाळा खानापूर ,ता. हवेली, जि. पुणे.
Blog : mohanshinde.blogspot.com
YouTube Channel : Mohan Shinde Art & Education Gallery